Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे १९ सप्टेंबर २०२३ रोजी जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी  गणपती बाप्पाचे वाजत गाजत स्वागत केले. गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा महाविद्यालयातील अतुल खोंडे यांनी सपत्नीक केली.

याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील (डी एम कार्डिओलॉजी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा.दीपक झांबरे (तंत्रनिकेतन समन्वयक) यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. मिरवणुकी दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता.

महाविद्यालयामध्ये हा गणेशोत्सव पाच दिवस साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवा निमित्त महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आणि स्पर्धा राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये दिनांक २० सप्टेंबर रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे व या स्पर्धेसाठी थीम म्हणून गणपती व चंद्रयान ३ या विषयांची निवड करण्यात आली आहे. हा कार्यक्रम प्रा. प्रिया इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. दिनांक २१ सप्टेंबर रोजी शाडू मातीचा गणपती बनवण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम प्रा. वैष्णवी नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल.

 

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महाविद्यालयामध्ये श्री गणेश उत्सव विद्यार्थी समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये तुषार पाटील, हेमंत झांबरे, आशिष पाटील, हिमांशू पाटील, अभिजीत पवार, हिमाक्षी राणे, दिपाली खोडके, सानिका राजकुळे व प्राची गिरासे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या सोबतीने महाविद्यालयाचे सर्वच विद्यार्थी या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविणार आहेत.  प्रा. आर व्ही पाटील, प्रा. सचिन महेश्री व प्रा. चंद्रकांत शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समिती कार्य करीत आहे.गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठे प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version