Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात रांगोळीने साकारली गजानन महाराजांची कलाकृती

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आज संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त रांगोळी कलाकार शैलेश कुलकर्णी यांनी ८ बाय ४ फूट आकाराची तब्बल ८ तास परिश्रमातून श्री. गजानन महाराजांचे रांगोळीतून कलाकृती रेखाटलेली आहे.

श्री. संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन संपूर्ण देशासह महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जात आहे. याच अनुषंगाने श्री. संत गजानन महाराज यांच्या विषयी ओढ निर्माण झालेला शहरातील कलावंत शैलेश कुलकर्णी याने पुनगाव रोडवरील श्री. संत गजानन महाराज मंदिरात सलग आठ तासांच्या मेहनतीने गजानन महाराज यांची हुबेहूब वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळीच्या माध्यमातून ८ बाय ४ आकाराची भव्य कलाकृती तयार केली आहे. शैलेश कुलकर्णी यांनी साकारलेल्या कलाकृतीचे परिसरातुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

 

 

Exit mobile version