Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहरूण येथे गाडगेबाबा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन 

WhatsApp Image 2019 12 20 at 3.43.47 PM

जळगाव, प्रतिनिधी | येथील मेहरुण भागातील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात सुरुवातीला संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक मंडळ संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यानंतर मुख्याध्यापक शीतल कोळी यांनी विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा यांचे जीवन आणि समाजकार्य याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यालयातील नैतिक किर्दक, भूमिका पाटील, साक्षी शिरसाळे, भाग्यश्री मिस्त्री, उत्कर्षा सपके या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या आयुष्यातील निवडक प्रसंग उपस्थितांना सांगितले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आभार उज्जवला नन्नवरे यांनी मानले.  प्रसंगी विद्यालय  परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक मुकेश नाईक, किरण पाटील, रोहिणी शिंदे, आम्रपाली शिरसाठ, साधना शिरसाठ तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version