Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले स्मार्ट एर्नजी मीटर

 

भुसावळ प्रतिनिधी । ‘विद्युत ऊर्जा’ हि आजच्या स्थितीला काळाची गरज आहे. घरगुती, व्यवसायिक तसेच प्रत्येकी कामासाठी विद्युत ऊर्जेची गरज भासत असते. विद्युत ऊर्जा ही विद्युत वितरण कंपनीकडून सर्वांना पुरवली जाते. त्याबद्दल आकारली जाणारी रक्कम हि विद्युतमिटरचा रिडींगने ठरते.

मात्र, काही लोक मीटरमध्ये फेरफार करून हे रिडींग कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते मीटरचे सील तोडतात किंवा इतर काही उपकरणांनी मीटरची गती कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण प्रस्तुत प्रोजेक्टमध्ये विद्युत चोरी थांबवण्यासाठी, वीज चोरण्याचा प्रयत्नांना आळा घालण्यात आला आहे. यात मायक्रोकन्टो्लरचा वापर करून वीजमीटर, वाय-फाय व मोबाईल नेटवर्कने विद्युत ग्राहक व वीज वितरक कंपनी यांचाशी जोडले आहे. ग्राहकाने मीटरचे सिल तोडण्याचा किंवा फेरफार करण्याचा प्रयत्न केल्यास, लगेच त्या ग्राहकाचा विजपुरवठा त्वरीत खंडित होईल. तसेच विज ग्राहक व वितरण कंपनी दोघांना केलेल्या प्रयत्नांचा मोबाईल संदेश पाठवला जाईल. मीटरच्या विविध बाबी: आहेत.तसेच ग्राहकाचा सुविधेसाठी एक मोबाईल अँप सुद्दा तयार केले आहे. ज्याचा वापर करून ग्राहक घराबाहेर असतांना कुठून ही घरातील विद्युत उपकरणे सुरू किंवा बंद तसेच नियंत्रित करू शकतो. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग ग्राहकांच्या सोयी सुविधा वाढवण्यासाठी होत आहे, कौशल्य आधारित शिक्षण देण्यात महाविद्यालय अग्रेसर आहेच. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह यांनी यावेळी सांगितले. अंतिम वर्षाच्या प्रतिक देशमुख, पुष्पक लोखंडे, अभिषेक पाटिल, केवल पाटिल, वैभव सावकारे यांनी हा प्रकल्प बनवला असून प्रा.जी.के. महाजन आणि प्रा. अजित चौधरी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

Exit mobile version