Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग.स.चे सूर्यवंशी व पाटील यांना जामिन मंजूर

8c3b1501 b19a 4f2a 9c50 0948467258ec 1

जळगाव प्रतिनिधी । ग.स.सोसायटीत ५० लाखांच्या बेनामी ठेवीप्रकरणी अटकेत असलेले सुनिल सुर्यवंशी आणि किरण पाटील यांना आज न्यायालयात हजर केले असता दोघांचा जामिन मंजूर करण्यात आला आहे.

ग.स.सोसायटी ५० लाखांच्या बेनामी ठेवीप्रकरणी खंडपीठाच्या आदेशावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष सुनिल सूर्यंवशी व विभागीय अधिकारी किरण पाटील या दोघांविरुध्द असंपदेप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात दोन्ही संशयित न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सरकारपक्षाने हरकत घेतली होती. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्या. देशपांडे यांच्या न्यायालयाने संशयित सुनिल सूर्यवंशी व किरण पाटील या दोघांना जामीन मंजूर केला आहे.

काय आहे हे प्रकरण
सुनिल अभिमन सूर्यवंशी (रा. हर्ष रेसिडेन्सी, फ्लॅट नं.03, अजय कॉलनी,रिंग रोड) हे जिल्हा परिषदमध्ये कक्ष अधिकारी होते. तसेच सूर्यवंशी हे जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीचे अध्यक्ष देखील होते. सूर्यवंशी यांनी जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीत विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले किरण भीमराव पाटील (रा. उषाकिरण अपार्टमेंट, श्रीकृष्ण कॉलनी) यांच्यासोबत संगनमत करत पतसंस्थेचे अध्यक्ष असतांना त्यांच्या नावावर बनावट खाते उघडुन उघडले. त्यानंतर अपसंपादीत बेहिशोबी ५०,००,००० रुपये अष्टचक्र ठेवीत ठेवुन नंतर व्याजासह ५१ लाख ७८ हजार ८८७ रुपये काढून फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माजी संचालक रावसाहेब मांगो पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

Exit mobile version