Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात “इलेक्ट्रिकल कॅड सॉफ्टवेअर”वर कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाच्यावतीने “इलेक्ट्रिकल कॅड सॉफ्टवेअर” या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल कॅड सॉफ्टवेअरच्या डिझायनिंग कमांडसह इलेक्ट्रिकल डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांची तांत्रिक कौशल्ये वाढवणे या विविध विषयावर इलेक्ट्रिकल कॅड सॉफ्टवेअर या विषयातील संशोधनकर्ते व इलेक्ट्रिकल कॅड हब सेंटरचे प्रशिक्षक महेश पवार यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल होम प्लॅन डिझाइन, वायरिंग इत्यादींवर चर्चा केली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा.मनीष महाले , प्रा.मधुर चौहान यांनी सहकार्य केले.  इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. बिपासा पात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे कार्यकारी संचालक प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version