Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

६६ हजार ३०० मतदारांच्या हाती ५०३ उमेदवारांचे भविष्य !

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यात बिनविरोध झालेल्या आठ ग्रामपंचायत वगळता उर्वरित २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी  १५ जानेवारी रोजी मतदान होत असून ६६ हजार ३०० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या २१८ जागांसाठी ५०३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण मतदान केंद्रे १४८ आहेत.

सुमारे ७०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदान प्रक्रियेसाठी करण्यात आलेली आहे. कासोदा व आडगाव, तळई, उत्राण. (आ.ह.) उत्राण.(गु.ह.) पिंपळकोठा बुद्रुक या तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींची निवडणूक होत असल्याने याठिकाणी निवडणूक लढविणार्‍या  आघाडी पैकी कोणत्या आघाडी ला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र कासोदा ग्रामपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य हे की या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेनुसार ह्या वेळा  कोणतेही पॅनल नसून उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुका दोन वेळा चुरशीच्या ठरणार आहेत आधी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी चुरशीच्या लढती होत आहेत . तर दुसऱ्यांदा सुरस सरपंच पदाचे आरक्षण कोणते निघणार आणि कोणता उमेदवार आरक्षणा प्रमाणे सरपंच पदासाठी पात्र होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

Exit mobile version