Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खून झालेल्या तरूणावर आसोदा येथे अंत्यसंस्कार

raincoat distribution

जळगाव प्रतिनिधी । येथील मु.जे. महाविद्यालयात खून झालेल्या तरूणाच्या पार्थिवावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा पोलीसांकडून तपास सुरू आहे.

काल मु.जे. महाविद्यालयात एका तरूणावर चॉपरने वार करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला होता. जोवर आरोपी पकडले जात नाहीत तोवर मृतदेह न स्वीकारण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला होता. मात्र पोलीस प्रशासनाने त्वरीत कार्यवाहीची ग्वाही दिल्यानंतर रात्री उशीरा मृत मुकेश मधुकर सपकाळे याचे शव विच्छेदन करण्यात आले. आज सकाळी पोलीस बंदोबस्तात त्याचा मृतदेह आसोदा येथे नेण्यात आला. यावेळी त्याचे कुटुंबिय, आप्त, शेजारी आणि मित्रमंडळीला अश्रू अनावर झाले होते. तेथील स्मशानभुमीत त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दुसरीकडे या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या इच्छाराम वाघोदेची चौकशी करून पोलिसांनी अन्य आरोपींचा माग काढण्यास प्रारंभ केला आहे.

Exit mobile version