Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव ग्रामीणच्या रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल ७५ कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात ७५ किमीच्या रस्त्यांसाठी ६६ कोटी ८६ लक्ष व देखभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी असा एकूण सुमारे ७० कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा काय पालट होणार आहे. ना. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या समितीमार्फत रस्तेबांधणी आणि दर्जोन्नतीसाठी गावांची निवड केली जाते तर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादन करणे, अतिक्रमणे हटविणे व इतर अडचणी दूर करुन समन्वय साधण्याची जबाबदारी असते.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर कामे अशी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात धरणगाव विवरे ते भवरखेडा रस्ता धरणगाव – विवरे – भवरखेडा ते तालुका हद्द ग्रा.मा. ४, ४६, ६४ व इजिमा ५५ रस्ता – (१२ किमी – ९ कोटी ४६ लक्ष ८४ हजार), झुरखेडा- खपाट ते पिंपळेसीम ग्रा. मा. १६, ७८ रस्ता ( ५ किमी – ३ कोटी ७७ लक्ष ६९ हजार), चावलखेडा ते पष्टाणे ग्रामीण मार्ग १९ , इजिमा ५८ , ५२ रस्ता (६ किमी- ४ कोटी ४२ लक्ष ३३हजार), विवरे – जांभोरा – सारवे खुर्द ते बिलखेडा ग्रा.मा. २९, ६६ , ५८ रस्ता ( १० किमी – ०८ कोटी २१ लक्ष ३५ हजार ) अश्या ४ रस्त्यांच्या ३३ किमी रस्त्यांसाठी २५ कोटी ८८ लक्ष २१ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर जळगाव तालुक्यातील डोमगाव – पाथरी ते तालुका हद्द ग्रा.मा. ४५ रस्ता ( किमी ७.८० – ६ कोटी ९ लक्ष २१ हजार), भोकर – पडसोद – जामोद – आमोदे ते गाढोदा इजिमा ४४ रस्ता ( १२ किमी – १० कोटी ५३ लक्ष ९६ हजार), आसोदा ते भोलाणे ग्रा.मा. १०५, इजिमा ०८ रस्ता (६.३० किमी ६ कोटी ८३ लक्ष ८३ हजार ), खेडी ते ममुराबादइजिमा ८८ रस्ता ( ५.७३ किमी – ६ कोटी ५१ लक्ष ७३ हजार), कानळदा ते रिधुर ग्रा.म. ३९ रस्ता (५.४५ किमी- ५ कोटी ७१ लक्ष ६४ हजार) , तसेच प्रजिमा ३९ ते शिरसोली रस्ता तालुका हद्द दहीगाव रस्ता ( ५ किमी – ५ कोटी २८ लक्ष १२ हजार) अश्या ६ रस्त्यांच्या ४२ किमी रस्त्यांसाठी ४० कोटी ९८ लक्ष ४९ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

जळगाव ग्रामीण मतदार संघात असा ७५ किमीच्या रस्त्यांसाठी ६६ कोटी ८६ लक्ष व देक्षभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी एकूण सुमारे ७० कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा काय पालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विषयी समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून, दुसरा टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्तेखर्‍या अर्थाने दर्जेदार होत आहे. प्रत्येक किलोमीटरसाठी ७५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद असून मक्तेदारावर ५ वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निश्चित केली गेली आहे. या योजनेत रस्त्यांचे काम दर्जेदार होणार असून गावांतर्गत कॉंक्रीट रस्ते, आवश्यक तेथे पूल , संरक्षक भिंती आदी कामांचा समावेश असल्यामुळे परिपूर्ण रस्त्याचा विकास होणार आहे.

जिल्ह्यातील गावे आणि वाड्या-वस्त्यांची जोडणी करण्यासाठी ही योजना लाभदायक व वरदान ठरत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून, जळगाव जिल्ह्यात संबंधीत शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात येत असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही ग्रामीण भागासाठी वरदान ठरत असल्याचा विश्वास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बोलतांना व्यक्त केला सदर रस्ते दर्जेदार होण्यासाठी यंत्रणांनी काळजी घेण्याचे निर्देशही गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version