तरूणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या फरार संशयीताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मिरवणुकीत झालेल्या भांडणाचा समझोता करण्यासाठी बोलावून तरुणावर प्राणघातक हल्ला करुन त्याच्यावर दगडफेकची घटना घडली होती. या गुह्यातील फरार संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

 

रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये झालेल्या वादाचा समझोता करण्यासाठी मयूर बागडे याने आकाश सोनार व ललित दिक्षीत याला ३ मे रेाजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कंजरवाड्याजवळील चोखामेळा येथे बोलाविले होते. दरम्यान, आकाश हा त्याचे मित्र बबलू धनगर, अविनाश राठोड, निशांत चौधरी याच्यासोबत दुचाकींनी त्याठिकाणी आले. यावेळी आठ ते नऊ जणांसह दोन जणांनी त्यांच्याशी वाद घालून सोबत आणलेल्या कोयत्याने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करीत त्यांच्यावर दगडफेक केली होती. याप्रकरणी आकाश सोनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसीपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार असलेला संशयित आरोपी मयूर जमनादास बागडे शहरात आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सुधीर साळवे, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी सोमवारी २३ मे रोजी रात्री संशयित आरोपी मयूर बागडे याला अटक केली. मंगळवारी २४ मे रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, किरण पाटील करीत आहे.

 

Protected Content