Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला कांचन नगरातून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी कांचन नगरातून शुक्रवारी १५ जुलै रोजी सांयकाळी अटक केली आहे.  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७०३ /२०२१ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी शुभम उर्फ दादू किशोर पाटील रा. कांचन नगर हा फरार होता. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना संशयित आरोपी शहरात आल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार शुक्रवारी १५ जुलै रोजी पोलीस ठाण्यातील शोध पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, छगन तायडे, योगेश बारी, किशोर पाटील यांनी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी शुभम उर्फ दादू किशोर पाटील रा. कांचन नगर याला कांचन नगर परिसरातून अटक केली आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version