Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खूनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अटक; एलसीबीची कारवाई  

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खूनाच्या गुन्ह्यात गेल्या १२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. पुढील कारवाईसाठी पिंपळगाव हरेश्वर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुक्तार जब्बार तडवी (वय-४१) रा. पिंपळगाव हरेश्वर हमु. खडकदेवळा ता. पाचोरा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, “मुक्तार जब्बार तडवी याने सन २००५ मध्ये रहिवाशी मुनीर कुतूब्बुद्दीन तडवी रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा याचच्या पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात मुक्तार तडवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मुक्तार तडवी याला २००६ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याची नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

दरम्यान, २९ जून २०१० रोजी १४ दिवस संचीत रजेवर सोडण्यात आले होते. त्यावेळी त्याने पुन्हा १४ दिवसांची संचीत रजेची वाढीव मागणी केली होती. ती देखील मंजूर केली होती. वाढीव संचीत रजा संपूनही तो कारागृहात हजर झाला नाही. त्यानुसार त्याच्यावर पिंपळगाव हरेश्वर येथे भादवि कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरारच होता.

दरम्यान, आरोपी मुक्तार तडवी हा खडकदेवळा ता. पाचोरा येथे असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाली. पथकातील पोउनि अमोल देवडे, स.फौ. अशोक महाजन, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजीत जाधाव, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर पाटील, अशोक पाटील असे पथक रवाना झाले. शुक्रवार २५ मार्च रोजी दुपारी त्याला खडकदेवळा येथून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

Exit mobile version