Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेगांव कोविड चाचणी केंद्रावर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

शेगांव प्रतिनिधी । राज्य सरकारच्या आदेशानंतर शेगाव नगर पालिकेकडून कोरोना चाचणी सक्तीने केल्यापासून कोविड चाचणी केंद्रावर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा पाहायला मिळत आहे. दरम्यान कोविड चाचणी केंद्रावर गेल्या दोन दिवसात १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यात कोविड चाचण्या वाढल्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये ही  वाढ झाली आहे. आता शानाच्या आदेशामुळे शेगाव नगरपालिकेने शहरात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी कोविड चाचणीसाठी सक्ती केल्यानंतर व्यापाऱ्यांनी चाचणी करून घेण्यासाठी केंद्रावर  गर्दी केली. आज बुधवारी तर केंद्रावर गर्दी आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करावे लागले. राज्य सरकारणे  चाचणी ची सक्ती केल्यानंतर शेगाव शहरातील टाऊन हॉल येथे आरोग्य विभागा मार्फत चाचणी केंद्र उभारले मात्र येणाऱ्या व्यापार्‍यांसाठी योग्य  नियोजन न केल्याने एका हॉलमध्ये दोनशे ते तीनशे लोक गर्दी करून सोशल डिस्टंसिंग फज्जा उडवित असल्याचे दिसून आले गर्दी आटोक्याबाहेर जात असल्याचे पाहून यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले.यावेळी आमच्या प्रतिनिधीने  काही व्यापारांसोबत चर्चा केली असता त्यांचा रोष दिसुन आला.

Exit mobile version