Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्यापासून अट्रावलच्या जागृत देवस्थान श्री. मुंजोबाच्या यात्रेस सुरूवात होणार !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यातील लाखो भक्त भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तालुक्यातील अट्रावल येथील श्री. मुंजोबा यांच्या पारंपारिक यात्रेस उद्या शनिवार १० फेब्रुवारी पासून प्रारंभ होत आहे. या देवस्थानच्या विश्वस्तांच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी यात्रेची परिपूर्ण तयारी झाली असून यात्रेस्थळी व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत.

पोलीस उपाधीक्षक अन्नपूर्णा सिंह व यावलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हरिष भोये यांनी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला असून यात्रोत्सव काळात कोणताही अपघात होणार नाही तसेच भाविकांच्या दर्शनासाठी विश्ववस्तांच्या माध्यमातुन काय सोयी सुविधा करणार याबाबतचा आढावा त्यांनी घेतला आहे. या यात्रा उत्सव वाराच्या काळासाठी यात्रेच्या दिवशी येथील यावलच्या एसटी आगारासह भुसावळ ,फैजपूर , चोपडा ,जळगाव येथून ही बसेस सुरू करण्यात येतात. या यात्रेसाठी दरवर्षी यात्रेकरूं भक्तांची वाढती गर्दी पाहता वर्षी देवस्थान समितीने चोख व्यवस्था केली आहे.

यावल तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिद्ध मुंजोबा मंदिर म्हणजे नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगत असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील बऱ्हाणपूर या जिल्ह्यासह जिल्ह्यातील भाविक यात्रेत हजेरी लावतात. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील शनिवार व सोमवारसह पोर्णिमेला ही यात्रा भरते. माघ शुक्ल पक्षातील पहील्या तीथीलाच शनिवार आल्याने आजपासून यात्रा प्रारंभ होत आहे. यावर्षी यात्रेचे पौर्णिमेसह पाच वार पडत आहेत.

यात्रेचे वार
१० फेब्रुवारी (शनिवार), १२ फेब्रुवारी (सोमवार), १७फेब्रुवारी (शनिवार) ,१९ फेब्रुवारी (सोमवार), २३ २४ फेब्रुवारी (पोर्णिमा) असे यात्रेचे वार आहेत यासह यात्रोत्सव काळात गर्दी टाळण्यासाठी तसेच सुटीचे व सोईनुसार मधल्या दिवसात ही येथे भाविकांची गर्दी असते.

जादा बसेस
राज्य परिवहन महामंडळाकडून यावल,  भुसावळ, फैजपूर, रावेर येथून एसटी बसेस सोडल्या जातात यात्रेच्या दिवशी येथील पोलीस ठाण्याकडून यात्रास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो यासह देवस्थानचे स्वयंसेवक बंदोबस्तासाठी तैनात केले जातात.

Exit mobile version