Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आजपासून महेंद्र सिंह धोनीचे सुरू होणार ‘मिशन काश्‍मिर’

ms dhoni

मुंबई वृत्तसंस्था । भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज (दि.31 जुलै) पासून तणावग्रस्त जम्मू-काश्मीरमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून 19 किलो वजन घेत पहारा देणार असल्याची माहिती भारतीय सैनिकांकडून मिळत आहे.

भारतीय सैन्याची सेवा करता यावी यासाठी धोनीनं टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली आहे. 31 जुलै तो 15 ऑगस्ट या कालावधीत काश्मीर खोऱ्यात व्हिक्टर फोर्ससोबत पेट्रोलिंग करणार आहे. या विभागात धोनी 19 किलोचं वजन घेऊन पहारा देणार आहे. धोनी ज्या बटालियनमध्ये सहभागी होऊन पहारा देणार आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. यात देशातील प्रत्येक विभागातून आलेले सैनिक आहेत. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. यावेळी धोनीकडे 5 किलो वजनाच्या 3 मॅग्जीन, 3 किलोचे पोशाख, 2 किलोची बूटं, 4 किलोचे 3 ते 6 ग्रेनेड, 1 किलोचे हॅल्मेट आणि 4 किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण 19 किलो वजन असणार आहे. धोनी यावेळी 50-60 सैनिकांसोबत बंकरमध्ये राहणार आहे. 38 वर्षीय धोनी लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असून, त्याच्याकडे लेफ्टनंट कर्नलपद आहे. 2011 साली भारतीय लष्करानं त्याला हा मान दिला. 2015 मध्ये त्यानं पॅराट्रुपरची परीक्षाही पास केली. श्रीनगर येथील बादामी बाग कँट विभागात धोनी 8-10 सैनिकांसोबत पहारा देणार आहे. यावेळी त्याला एके-47 रायफल आणि 6 ग्रेनेड व बुलेटप्रुफ जॅकेट देणार आहे. धोनी गार्ड यूनिटमध्येही रक्षकाचे काम पाहणार आहे. तो 4-4 तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम करणार आहे. ही ड्युटी दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये करावी लागणार आहे. दिवसपाळीत त्याला पहाटे चार वाजता उठावे लागणार आहे.

Exit mobile version