म्हसावद येथे मालवाहतूक ठरते ग्रामस्थांची डोकेदुखी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील इंदिरानगर परिसरात अवजड वाहतूकीमुळे स्थानिक रहिवाशांची डोकेदुखी ठरत आहे. या अवजड वाहतूकीमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील इंदीरा नगरात अवजड वाहनांची मोठी वर्दळ सुरू झाली आहे. ही वाहतूक दिवसेंदिवस वाढत असल्याने रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. यासंदर्भात अनेकवेळा तक्रारी करूनही याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असेल असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे.

 

वाहतूक होत असतांना एखाद्या वाहनाचा धक्का लागल्याने वाद विकोपाला जात. यातून हाणामारी देखील झाल्याचे प्रकार होत आहे. स्थानिक रहिवाशांना वाहनधारकांकडून शिवीगाळ करून धमकी दिली जात आहे. पोलीस प्रशासनाने अवजड वाहतूक बंद करून ही वाहतूक दुसऱ्या मार्गाने होईल असे नियोजन करण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

Protected Content