Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘व्हाईस ऑफ डॉग’ या संस्थेतर्फे भटके, पाळीव कुत्रे आणि मांजरीचे मोफत लसीकरण

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जुने बी.जे. मार्केट येथे व्हाईस ऑफ डॉग या प्राणीमित्र संघटनेच्या वतीने शहरातील १५० हून अधिक भटक्या, पाळीव कुत्रे आणि मांजरी यांचे मोफत लसीकरण करण्यात आले.

जळगाव शहरातील “व्हाईस ऑफ डॉग” या प्राणीमित्र संघटनेच्या वतीने शहरातील १५० हून अधिक प्राण्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले. यामध्ये मोकाट आणि पाळीव कुत्रे तसेच मांजरींचा ही समावेश होता. यासोबतच सर्व प्राण्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. संघटनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोफत शिबीरात शहरातून प्रतिसाद मिळाला.

सदरील शिबीर डॉ. राठोड यांच्या मार्गर्शनाखाली शिबिर राबिविण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी व्हाईस ऑफ डॉग संघटनेचे सदस्य शुभम चौधरी, तुषार चौधरी, हेमंत चौधरी, मोहित सेठीया, पवन सपकाळे, विशाल निंबाळकर, भुषण कांबळे, रोहित नाथजोगी, आदिती अडकमोल, स्नेहा सोनवणे, अमित हिरोले, सुमित सोनवणे, राहुल पवार, विवेक सुतार यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version