Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय कार्यालयामधील प्रभारी राजपासून मुक्त करा – शेखर पाटलांची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील यांनी रावेर यावल मतदार संघाचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी तालुक्यातील नागरिकांना गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विविध शासकीय कार्यालयात प्रभारी राजपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.

यावल पंचायत समिती नुतन प्रशासकीय ईमारतीच्या सभागृहात नरेगा संदर्भातील ग्रामरोजगार व ग्रामसेवक आणी सरपंच यांच्या समस्यांवर चर्चा करण्याबाबत आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत संयुक्त आढावा बैठकीत शेखर पाटील हे बोलत होते.

यावल तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयावर प्रभारी अधिकारी यांची नेमणुक असल्याने अधिकारी हे पुर्ण वेळ देत नसल्या कारणांने तालुक्यातील विविध शासकीय कामे ही प्रलंबीत असुन ग्रामीण पातळीवर याचा मोठा परिणाम जाणवत असल्याचे शेखर पाटील यांनी सांगीतले. आमदार शिरीष चौधरी यांनी तालुक्यात कायमस्वरूपी शासकीय सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणुकी केल्यास तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न व कामे मार्गी लागतील असा विश्वास शेखर पाटील यांनी या बैठकीत व्यक्त केला.

या आढावा बैठकीत कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रूबाब तडवी, ग्रामरोजगार संघटनेचे कार्यध्यक्ष बाळु तायडे यांच्यासह ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, सरपंच मोठया प्रमाणावर याप्रसंगी उपस्थित होते.

Exit mobile version