Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उडाण फाऊंडेशनतर्फे नागरिकांची मोफत तपासणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात जागतिक फिजिओथेरपी दिवस साजरा करण्यात आला. उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि गोदावरी फाऊंडेशन संचालित डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या माध्यमातून दिवसभरात १५० दिव्यांग बालक आणि त्यांच्या पालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यात दिव्यांग मुलांसाठी उडाण फाऊंडेशन नेहमी विविध उपक्रम राबवित असते. गेल्या महिन्यातच दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली होती. बुधवार दि.७ सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त उडाणच्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरीपी यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थी तसेच इतर पालकांची मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबीर घेण्यात आले. दिवसभरात १५० विद्यार्थी, नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून समाजकल्याणचे अधिकारी हे लाभले तर भरत चौधरी, पुष्पा भंडारी, धनराज कासाट, विनोद बियाणी, एस.पी.गणेशकर यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांनी करताना शिबिराचे महत्व तसेच उडाणचा उद्देश स्पष्ट केला. शिबिरात फिजिओथेरीपीस्ट डॉ,निखिल पाटील, डॉ.प्रीती पाटील, डॉ.आदित्य खाचणे, डॉ.केतकी साखळकर, डॉ.रिद्धी भंडारी, डॉ.अश्विनी मोलेकर आणि सोबत इतर ७ डॉक्टर्स यांनी सर्व पेशंटची तपासणी आणि उपचार केले. सूत्रसंचालन उज्वला वर्मा यांनी केले. कार्यक्रमासाठी उडानच्या अध्यक्ष हर्षाली चौधरी यांच्यासह चेतन वाणी, जयश्री पटेल, सोनाली भोई, हेतल वाणी, अनिता पाटील यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version