Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी फाऊंडेशनतर्फे विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे स्व.सौ.सुमन जगन्नाथ महाजन यांच्या स्मरणार्थ २५ व २६ नोव्हेंबर रोजी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मेडिकल सर्विस डायरेक्टर तथा सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील यांनी दिली.

या शिबिरासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त जटील शस्त्रक्रियांचा अनुभव असलेले पुणे येथील डॉ.पंकज जिंदल, मुंबई येथील डॉ.शंकर सुब्रमण्यम हे येणार आहे. या शिबिरात हातासह बोटाच्या व्यंगाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच जळालेले व्यंग भाजल्यामुळे येणारे व्यंग, जन्म: असलेले हाताचे, पायाचे व शरिावरील व्यंग, जुळलेली वाकडी कमी व जास्त बोटे, न पसरणारे कोड, दुभंगलेले ओठ व टाळू अशा विविध व्यंगावर उपचार केले जाणार आहे.

हे शिबिर संपूर्ण: मोफत असून नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. नावनोंदणीसाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रुग्णालयातील मार्केटिंग विभागातील रत्नशेखर जैन यांच्याशी ७०३०५७११११, रो.डॉ.अशोक पाध्ये व रो.डॉ.वैजयंती पाध्ये यांच्याशी भास्कर मार्केट, जळगाव येथे किंवा मोबाईल क्रमांक ९८२२६३७८८४, सुशील टायर हाऊस, लक्ष्मी टॉवर, जळगावचे ९३७२२६६७७९, रो.डॉ.गोविंद मंत्री, गोल्ड सिटी हॉस्पिटल यांच्याशी ०२५७-२२२४७७७ या क्रमांकावर संपर्क साधावा. या भव्य विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब जळगाव ईलाईटचे अध्यक्ष रो.अजित महाजन, प्रकल्प प्रमुख रो.डॉ.वैजयंती पाध्ये, डायरेक्टर मेडिकल सर्विसचे रो.डॉ.वैभव पाटील, सचिव रो.अभिषेक निरखे यांनी केले.

Exit mobile version