Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यातील महिलांना मोफत पिंक ऑटो प्रशिक्षणाची संधी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील मराठी प्रतिष्ठान व मराठी अस्मिता प्रतिष्ठान यावल यांच्या संयुक्त सहकार्याने यावल तालुक्यात पिंक आटो प्रशिक्षण शिबिर सुरू होणार आहे.

ज्या महिलांना रिक्षा व्यवसायात यायचे असेल त्यांनी मराठी अस्मिता प्रतिष्ठान यावलचे अध्यक्ष चेतन आढळकर यांच्याशी 86575 45202 आणि 97300 71015 या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जळगाव शहरात पाच महिला गेल्या तीन वर्षापासून पिंक ऑटो चालवत आहे. येणाऱ्या काही दिवसात आणखी दहा महिला पिंक आटो व्यवसायात पदार्पण करीत आहेत.

महिलांनी या नावीन्यपूर्ण व्यवसायात यावे. याकरता मराठी प्रतिष्ठान व मराठी अस्मिता प्रतिष्ठान यांच्यामार्फत यावल तालुक्यातील गरजू महिलांना मोफत रिक्षा प्रशिक्षण दिले जाणार आहे. लायसन बॅच परमिट शासकीय दरात करून दिले जातील. रिक्षा घेण्याकरता बँकेकडून अर्थसहाय्यबाबत मराठी अस्मिता प्रतिष्ठान सहकार्य करणार आहे.

गुरुवार, दि. 1 सप्टेंबरपासून यावल तालुक्यातील महिलांना रिक्षा प्रशिक्षण घेण्याकरता नाव नोंदणी सुरू करण्यात येणार आहे व दि. 15 सप्टेंबरपासून यावल येथे रिक्षा प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे.

यावल तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवावा व रिक्षा चालक-मालक व्हावे. असे आवाहन मराठी अस्मिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन आढळकर यांनी केले आहे.

Exit mobile version