Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोफत फिरत्या रूग्णवाहिकेचे आ. चिमणराव पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

पारोळा प्रतिनिधी । ‘उत्तम बियाणे, उत्तम सेवा आणि सर्वोत्तम जीवन राशी सिड्स’ या कंपनीच्या मोफत फिरता दवाखाना या रूग्णवाहिकेचे आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार चिमणराव पाटील यांनी राशी सिड्सचे कौतुक करत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या वैद्यकीय सेवेचा कसा लाभ देता येईल याचे नियोजन करण्याचे आवाहन केले.  या उद्घाटन वेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, शहरप्रमुख अशोक मराठे, माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, बाजार समिती उपसभापती दगडु पाटील, धुळपिंप्री सरपंच तथा राशी सिड्सचे अधिकृत विक्रेते संजय पाटील, राशी सिड्सचे जिल्हा प्रतिधीनी अमोल बोरसे, तालुका प्रतिधीनी दिपक पाटील, वैद्यकीय अधिकारी डाॕ.रोहीत बोथ्रा, फार्मसिस्ट जाकिर शेख, युवासेना उपतालुकाप्रमुख समाधान मगर, युवासेना शहरप्रमुख आबा महाजन, उपशहरप्रमुख सावन शिंपी, शेतकी संघ संचालक सुधाकर पाटील, राजेंद्र पाटील, व्यवस्थापक भरत पाटील, बाजार समिती संचालक प्रा.बी.एन.पाटील, सचिव रमेश चौधरी, जळुचे सरपंच गुलाबसिंग पाटील, छोटु चौधरी, पंकज मराठे, शुभम बोरसे संजय गोसावी पी.आर. वाणी व आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version