Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदा येथे कुसुम बहुद्देशीय संस्थेतर्फे मोफत माक्स वाटप

सावदा प्रतिनिधी । येथील कुसुम बहुद्देशीय संस्था, सावदा मानिनी फॉऊडेशन तसेच आराध्य सपोर्ट यांच्या वतीने आज सावदा येथील लसीकरण केंद्रावर जाऊन तसेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.

कोरोना व्हायरस टाळण्यासाठी आणि व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी फेसमास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला. मास्क न वापरणाऱ्या लोकांना अनेक ठिकाणी दंड सुद्धा भरावा लागला असल्याच्याही बातम्या आपण वाचल्या असतील. मास्कमुळे कोरोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात नियंत्रण येत असल्याचं आढळलंय. म्हणूनच मास्क लावाल, तर वाचाल’, अशी जाहिरातही आता सरकारकडून केली गेली. कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला.

 कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जरी होत असला तरी कोरोना’ची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असे असताना देखील बरेच नागरिकांनी मास्क घालणे बंद केल्याचे दिसून येते. कोरोन ची तिसरी लाट येऊ नये ती येण्याआधीच आपण कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज असले पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सावदा येथील कुसुम बहुद्देशीय संस्था सावदा, व पुणे येथील मानिनी फौन्डेशन तसेच आराध्य सपोर्ट यांच्या वतीने आज सावदा येथे लसीकेंद्रावर जाऊन महिलाना व पुरुषांना मोफत मास्क वाटण्यात आले. 

तसेच सावदा येतील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन तेथील पेशंटला व सर्व कर्मचारी वर्गाला देखील मास्क वाटण्यात आले. मास्क वाटण्याचा हा उपक्रम पुढेही असाच सुरु ठेवून शक्य होल तितके दवाखाने तसेच शक्य होईल तेवढ्या लसीकेंद्रांवर, मास्क वाटप करणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा मंजुषा पाटील यांनी सांगितले. 

यावेळी लसीकरण केंद्रावर ग्रामीण रुग्णालयातील डॉ. निलजा पाटील, डॉ. तायडे, डॉ. दीपिका ओक, सिस्टर हेमलता भंगाळे, दिपाली कोल्हे,  ए. डी. तडवी, अमित प्रदिप बेंडाळे हे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान संस्थेचे सचिव प्रदीप कुळकर्णी, पदाधिकारी हर्षल सेन्दाने, मनीषा सोनार, अमेय कुळकर्णी आदींनी सहकार्य केले.

 

Exit mobile version