Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ.शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त समता फाऊंडेशनतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर तर साकेगाव येथील चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर पाल येथील आश्रम शाळेत घेण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन आमदार शिरिष चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. त्यांच्यासोबत व्यासपीठावर वृंदावन धाम पाल येथील परम पूज्य संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज, सातपुडा विकास मंडळ पाल येथील सचिव अजित पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, संत श्री हरिष चैतन्यजी महाराज, संत श्री शिव चैतन्यजी महाराज, समता फाउंडेशनचे डॉ. राजेंद्र दौंड, डॉ. नितीन महाजन, चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत पुराणिक, सातपुडा विकास मंडळ पाल येथील प्रशांत बोंडे, देविदास हडपे, हमिद तडवी, मयाबु तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मयोगी दादासाहेब चौधरी, कै. पू. लोकसेवक मधुकरराव चौधरी, कै.पू. भाऊसाहेब बोंडे, कै.पू. सुनीतभाई बोंडे, यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. डॉ. प्रशांत पुराणिक, डॉ. राजेंद्र दौंड, परम पूज्य संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार शिरिष चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर शिबिरात नेत्र तपासणी, कुपोषित बालके, स्तनदा माता, गरोदर माता, जोखमीच्या माता, सॅम मॅम बालके व इतर सर्व रोग तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये एकूण 371 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमास समता फाउंडेशन मुंबई येथील डॉ. राजेंद्र दौंड व त्यांचे वैद्यकीय पथक, चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालय साकेगाव व त्यांचे वैद्यकीय पथक, सातपुडा विकास मंडळ, पाल, कार्यकर्ता परिवार, कृषी विज्ञान केंद्र पाल, कार्यकर्ता परिवार, पाल व परिसरातील ग्रामस्थ  उपस्थित होते  सूत्रसंचालन वैभव पाटील तर आभार प्रदर्शन नरेंद्र साठे यांनी केले.

उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थित मान्यवर ग्रामस्थ व सातपुडा विकास मंडळ पाल कार्यकर्ता परिवार यांनी आमदार शिरीष चौधरी यांना वैयक्तिक शुभेच्छा दिल्या.

 

Exit mobile version