Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापालिकेतर्फे बचत गटातील सदस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

WhatsApp Image 2019 08 29 at 6.37.24 PM

जळगाव, प्रतिनिधी | दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरि उपजीविका अभियान महापालिकेत यांच्यातर्फे आयुष्यमान भारत योजना अंतर्गत गुरुवार २९ ऑगस्ट रोजी छत्रपती शाहू हॉस्पिटल शाहूनगर येथे एनयुएलएम विभाग मनपा जळगाव मार्फत स्थापित सर्व बचत गटातील सदस्यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आयुक्त डॉ. उदय टेकाळे तसेच महिला व बालकल्याण सभापती मंगला चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या आरोग्य तपासणी शिबिरात ९५८ महिलांनी लाभ घेतला. यामध्ये त्यांना मोफत औषधी वाटप देखील करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी ऑर्किड हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल व गोदावरी हॉस्पिटल मधील डॉक्टरांचे तपासणी पथक उपस्थित होते. या कार्यक्रमाकरिता उपआयुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी मिनिनाथ दंडवते, उपआयुक्त अजित मुठे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. रावलानी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन आशा चौधरी यांनी केले प्रास्ताविक गायत्री पाटील यांनी तर आभार शालिग्राम लहासे यांनी मानले.

Exit mobile version