Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी आणि गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या संयुक्तरित्या महाविद्यालयात आज 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमा प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी आरोग्य दिनाचे महत्व सांगितले. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, आरोग्य चांगले असेल तर कामात कसलीही अडचण येणार नाही. कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी आपण डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे जेणेकरून आजारावर मात करता येईल. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होत आहे.  फास्ट फूड, बेकरी पदार्थ इत्यादींचे खाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते यांच्या सेवनाने पोटाच्या समस्या वाढतात यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. फळं, पालेभाज्यांचा जास्त समावेश आपल्या आहारात करायला हवा ज्यामुळे शरीराला योग्य त्या जीवनसत्त्वांचा लाभ मिळेल व शरीराचे कार्य सुरळीत चालू राहील.

आरोग्य दिनाचे औचित्य साधून मोफत   Health checkup camp महाविद्यालयात आयोजित केलेला होता. यावेळी महाविद्यालयातील MBA, BBA, BCA च्या विद्यार्थ्यांनी, Physiotherapy, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, व इतर लोकांनीसुद्धा या मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. सदर तपासणी साठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील डॉ.जीवक काकडे, डॉ. क्षितिज इसासरे, डॉ. अमन अग्रवाल यांच्या समवेत नर्स शुभांगी पनमंद, अश्विनी नेरे उपस्थित होते. मेडिकल कॉलेजचे PRO मकरंद महाजन हे सुध्दा उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाचे डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दिपक दांडगे, मयुर पाटील,  गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे,  प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, जयश्री चौधरी, भावना ठाकूर इ. कर्मचारी उपस्थित होते.

 

Exit mobile version