Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सांगवी येथे मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रीया शिबीर संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी बु॥ येथे डॉ कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.

सांगवी बु॥ येथे आज मंगळवार, दि १४ जून रोजी ग्रामपंचायतजवळ सांगवी बु तालुका यावल येथे संपन्न झालेल्या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली. या वेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना शस्त्रक्रियेसाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना करण्यात आले.

इतर रुग्णांना योग्य सल्ला व मार्गदर्शन देऊन उपचार करण्यात आले. डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. या शिबिरात एकूण १०५ नेत्र रुग्णांची तपासणी व ११ रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले.

सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा यांनी मार्गदर्शन केले. नेत्र चिकित्सक डॉ संजू शुक्ला यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली. या वेळी डॉ कुंदन फेगडे व युवराज देसर्डा यांनी रुग्णांना आपल्या मनोगतातून योग्य मार्गदर्शन सल्ला दिला.

यावेळी डॉ फेगडे म्हणाले की, “माझ्या व माझ्या मित्रपरिवार च्या सहकार्यातून वृद्ध सेवा होत आहे हे मी माझे भाग्य समजतो व यानंतरही संपूर्ण यावल तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने मी व माझा संपूर्ण मित्र परिवार कार्य, सेवा करत राहतील.” अशी इच्छा व्यक्त केली.

सरपंच रसीद तडवी यांच्या हस्ते भारत मातेच्या व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश भंगाळे होते. या प्रसंगी सरपंच रशीद तडवी, दिनेश पाटील,  अभय नेमाडे, प्रकाश सोनवणे,  प्रतिभा पाटील, विक्रम मेघे, प्रकाश सोनवणे, प्रशांत चौधरी, बाळू चौधरी, शरद तायडे, राजू तडवी, कुंदन कोळी, नितीन कोळी, दिपक कोळी, प्रशांत बेंडाळे, मनिष धांडे, जयंत बोरोले, जितू कोळी, उदय पाटील, भूषण सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती, या शिबिरासाठी सागर लोहार, मनोज बारी विशाल बारी, रितेश बारी आणि मित्र परिवार आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version