Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऑनलाईन टेंड्रीगच्या व्यवहारात महिलेची फसवणूक; २६.५० लाख रूपयांचा घातला गंडा

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोशल मीडियावर आकर्षक जाहीरात करून एका उच्चशिक्षीत महिलेला ऑनलाईन ट्रेडिंगच्या व्यवहारात तब्बल २६ लाख ५० हजारांचा गंडा घालत फसवणूक करण्यात आली. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठत आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला एकता राजेश जैस्वाल ( वय-३३, रा. चिकलठाणा ) राहतात. त्यांना सोशल मीडीयावर एक ट्रेडिंग क्लास बाबत जाहिरात दिसली. त्यावर एकता यांनी क्लिक केले असता त्यांना केकेआरसीए स्डडींग ग्रुपमध्ये ॲड झाल्या.

त्यानंतर त्या गृपच्या ॲडमीन अनुराग ठाकुर नावाच्या व्यक्तीने एकता यांना एक लिंक पाठवली. त्यावरून केकेआरग्रुपसाठी खाते उघडण्याची सुचना केली. त्यावर एकता यांनी खाते उघडले. त्यावर आरोपी अनुराग ठाकुर याने त्यावर गुंतवणुक करा असे सांगितले. त्यावर एकता यांनी गुंतवणुक केली. त्यावर एकता यांना चांगला परतावा मिळाला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला.

त्यांनी टप्याटप्याने मोठी गुंतवणूक केली. आरोपींनी त्यात वाढ होत असल्याचे त्यांना रिपोर्ट दाखविले पैसे त्यांनी पैसे त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तुम्ही पैसे गुंतवणुक करत रहा त्यानंतर मिळत राहील अशी थाप मारली. एकता यांनी तीन ते चार वेळेस पैसे मागीतले तरी आरोपीने वेगवेगळी कारणे सांगत टाळाटाळ केली.

Exit mobile version