Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विमा पॉलिसीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक : मनसेची एसपींकडे तक्रार

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील नागरीकांची विमा पॉलिसी काढून घेण्याच्या नांवाखाली काही दलालांच्या माध्यमातून विम्याचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवुन फसवणारी टोळी सक्रीय आहे. अशाप्रकारे नागरीकांची फसवणूक करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी लिखित तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन फैजपूर विभागाचे प्रांतअधिकारी कैलास कडलग व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे .

 

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिलेल्या तक्रार नियेदनात म्हटले आहे की , यावल तालुक्यातील काही दलाल हे नागरीकांना मिळणाऱ्या विमा पॉलीसीच्या नावाखाली नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी आमिष दाखवितात प्रसंगी विम्याची रक्कम ही स्वतः भरून पॉलिसीचे कागदपत्रे हे आपल्याकडे ठेवून संबंधीत नागरीकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत . या योजने अतर्गत काढण्यात येत असलेली विमा योजनेची पॉलीसी स्वतःच्या नांवावर काढून घेण्याचे गंभीर प्रकार घडत आहे. या गोंधळामुळे खरे व पात्र लाभार्थी हे विम्याच्या माध्यमातुन मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासुन वंचीत राहावे लागत आहे . अशा प्रकारे तालुक्यात नागरीकांची विमा पॉलीसीच्या नांवाखाली फसवणूक करणारी मोठी टोळी सक्रीय असल्याची तक्रार करण्यात आली असून संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी एका लिखित तक्रारीव्दारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे . या निवेदनावर जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर, तालुका उपाध्यक्ष शाम पवार , शहराध्यक्ष किशोर नन्नवरे , शहर उपाध्यक्ष आबिद कच्छी , विद्यार्थी सेनेचे गौरव कोळी, तालुका उपाध्यक्ष अनिल सपकाळे यांच्या स्वाक्षरी आहे .

Exit mobile version