Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केळी विक्रेत्या महिलेची दीड लाखात फसवणूक; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या केळी विक्री करणाऱ्या महिलेची दीड लाख रुपयांची फसवणूक करत पैसे मागितलं तर करंट मारून जीवे ठार मारेल अशी, धमकी दिल्याचा खडबड जनक प्रकार १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आला आहे. या संदर्भात रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोकिळा भगवान सोनवणे (वय-५०, रा. दादावाडी पिंप्राळा) यांचे पिंपळा परिसरातीलच सोनी नगर येथे ज्योतिबा फ्रुट कंपनी आहे. या माध्यमातून त्या केळीसह इतर फळ विक्री करण्याचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. १० जून रोजी श्रीकृष्ण तुकाराम मेघडे (रा. मुरली मनोहर अपार्टमेंट सावखेडा रोड, सोनी नगर, जळगाव) याने कोकिळाबाई सोनवणे यांच्याकडून व्यवसाय करण्याकरता दीड लाख रुपये रोख घेतले होते. त्यानंतर २ महिन्यांनी महिलेने श्रीकृष्ण मेगडे याला पैशांची मागणी केली. त्यानंतर त्याने मी पैसे देत नाही असे सांगून तुला करंट लावून मारून टाकेल अशी धमकी दिली. दरम्यान महिलेने शुक्रवार १५ डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी श्रीकृष्ण तुकाराम मेघडे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.

Exit mobile version