Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

Fraud : बनावट स्वाक्षऱ्या करून तिघांनी वारसाची रक्कम लाटली

पाचोरा – लाईव्ह‍ ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बँकेत वारसाची खोटे दाखले दाखवत बनावट सही व अंगठे घेवून महिलेची १२ हजार रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील वरखेडी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत संशयित आरोपी आनंद शंकर वाघ, अभिमन शंकर वाघ आणि गोविंद महादू पाटील सर्व रा. लोहारी ता. पाचोरा जि.जळगाव यांनी संगनमताने कल्पना रविंद्र शिंदे रा. पाळधी ता. जामनेर व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक करत त्यांच्या वारसाची रक्कमेसाठी बनावट सह्या अंगठे मारून बँकेतील रक्कम वर्ग करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्पना शिंदे यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तिघांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी आनंद शंकर वाघ, अभिमन शंकर वाघ आणि गोविंद महादू पाटील सर्व रा. लोहारी ता. पाचोरा जि.जळगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र शिंदे करीत आहे.

Exit mobile version