Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंगणघाट येथे दोन महिलांसह चौघं नदीत बुडाले

 

वर्धा (वृत्तसंस्था) हिंगणघाट येथे तोल जाऊन दोन महिलांसह दोन लहानगे नदीत बुडाल्याची दुर्देवी घटना आज दुपारी घडली.

 

हिंगणघाट येथे वणा नदीत हरतालका विसर्जनासाठी महिला जमलेल्या होत्या. यावेळी दोन महिला आणि दोन लहानग्यांचा अचानक तोल गेल्याने हे चौघेही नदीत पडले. त्यामुळे नदीवर आलेल्या इतर महिलांनी जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. परंतू मदत मिळेपर्यंत चौघं जण बुडालेले होते. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर नदीत बुडालेल्या चौघांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी एका महिलेचा मृतदेह नदीतून काढण्यात यश आले. मात्र आणखी एक महिला आणि दोन लहानग्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

Exit mobile version