Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत धनाजी नाना महाविद्यालयाचे चार विद्यार्थी

faizapur

फैजपूर प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये विविध विषयात गुणवत्तापूर्ण घवघवीत यश संपादन करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या शैक्षणिक गुणवत्ता यादीत चार विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके व विशेष प्राविण्य मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या विद्यार्थ्यांनी केले यश संपादन
यात  दिपाली पाटील, एम.एस्सी. इनऑरगॅनिक केमिस्ट्री विषयात विद्यापीठात सर्वप्रथम (सीजीपीए 9.30), कुणाल मानकर बी.एस्सी.सूक्ष्मजीवशास्त्र विषयात विद्यापीठात सर्वप्रथम व सुवर्णपदक (सीजीपीए 5.97), तेजस्विनी पाटील, एम.ए.हिंदी विषयात विद्यापीठात सर्वप्रथम व सुवर्णपदक (सीजीपीए 9.88 ), सुषमा पाटील, एम.ए.हिंदी विषयात विद्यापीठातून द्वितीय (सीजीपीए 9.88) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

यांनी केले कौतुक
या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार रावेर विधानसभा मतदार संघ, शिरीष चौधरी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस.के.चौधरी, दामोदर पाटील, चेअरमन- लीलाधर चौधरी, व्हा. चेअरमन प्रा.के.आर.चौधरी, सचिव प्रा.मुरलीधर फिरके, सदस्य- प्रा.पी.एच.राणे, मिलिंद वाघुलदे, इतर सन्मा. कार्यकारणी सदस्य, पदाधिकारी यासोबत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा.डी.बी तायडे, उपप्राचार्य प्रा.डॉ.अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.उदय जगताप तसेच रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.ए.के.पाटील, हिंदी विषयाचे विभागप्रमुख प्रा.डी.कल्पना पाटील, सूक्ष्मजीव शास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. वैशाली महाजन यासोबत महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

Exit mobile version