Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चार नराधमांकडून एचआयव्हीग्रस्त तरुणीवर सामूहिक बलात्कार

rape and muder mumbai

मुंबई (वृत्तसंस्था)एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईतून चार जणांना अटक करण्यात आलीय. दरम्यान, पिडीत तरुणी एचआयव्हीग्रस्त आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, पिडीत तरुणी आपल्या मैत्रीणीच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून रात्री घरी जात असताना अचानक चार जणांनी जबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेत. त्यानंतर घटनास्थळावरून चौघांनी पळ काढला. पीडित तरुणी घरी आल्यावर चक्कर येऊन खाली कोसळली. डॉक्टरांनी पिडीत तरुणीवर सामूहिक बलात्कारा झाला असल्याचे सांगितले. गुन्हा मुंबईत घडलेला असल्याने बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने हस्तांतरित केला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पिडीत तरुणी मूळ जालन्याची राहणारी असून ती सध्या मुंबईत आपल्या भावासोबत राहते.

Exit mobile version