Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कन्नड घाटातील वसुली प्रकरणी चार पोलीस निलंबीत

जळगाव प्रतिनिधी | चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कन्नड घाटातून जाणार्‍या अवजड वाहनधारकांकडून वसुली करण्याची बाब स्टींग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणली होती. यातील दोषी चार कर्मचार्‍यांना पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबीत केले आहे.

याबाबत वृत्त असे की, आमदार मंगेश चव्हाण यांनी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत कन्नड घाटात स्टींग ऑपरेशन केले. यात ते स्वत: ट्रक ड्रायव्हर बनले होते. तेव्हा त्यांच्याकडून पाचशे रूपयांची मागणी करण्यात आली. तसेच अन्य वाहनधारकांकडूनही याच प्रकारची वसुली करण्यात आल्याचे या स्टींगमधून दिसून आले होते. आमदारांनी याबाबत पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली होती.

दरम्यान, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या प्रकरणी चौकशी करून यात दोषी आढळून आलेल्या गणेश वसंत पाटील, प्रकाश भगवान ठाकूर, सतीश नरसिंग राजपूत आणि संदीप भरत पाटील या चार पोलीस कर्मचार्‍यांना निलंबीत केले आहे.

 

Exit mobile version