Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पूल दुर्घटनाप्रकरणी चार अधिकारी निलंबित  

 

 

 

मुंबई (वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी मुख्य अभियंता ए.आर.पाटील, एस.ओ.कोरी आणि उपमुख्य अभियंता आर.बी.तारे व सहाय्यक अभियंता एस.एफ.काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, स्ट्रक्चर ऑडिटचा चुकीचा अहवाल देणारी देसाई कन्सल्टनला काळ्या यादीत टाकले आहे. तर कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला झाला असून ३० हून अधिक लोक जखमी झाले. जखमींची प्रकृतीही गंभीर आहे.  दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांत कलम ३०४ अ अंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version