Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चौघांकडून तरूणावर धारदार वस्तूने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजी नगरात राहणाऱ्या तरूणाला अमनपार्क येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार वस्तूने मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी २५ नाव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडली होती. याप्रकरणी रविवारी २६ नाव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रईस शेख रशिद शेख वय-३०, रा. शिवाजी नगर, अमन पार्क, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी २५ नाव्हेंबर रोजी रात्री १० वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच परिसरात राहणाऱ्या नदीम अहमद शेख , वाहिद शेख असद, खलील, इस्माईल आणि वसील (पुर्ण नाव माहित नाही) या चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तर एकाने धारदार वस्तूने वार करत जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर रईस शेख याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रविवारी २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय झाल्टे करीत आहे.

Exit mobile version