Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आज भाजपमध्ये आणखी चार नेत्यांनी केलाय प्रवेश

4 nete

 

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आज दि. 31 जुलै रोजी मुंबईतल्या गरवारे क्लब येथे भाजपामध्ये राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी जाहीररित्या प्रवेश केला आहे.

नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजपाचे प्रमुख नेते यावेळी हजर आहेत. तसेच प्रवेश करणा-या नेत्यांबरोबर त्यांच्या समर्थकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळली. आमदार वैभव पिचड, शिवेंद्रसिंहराजे, संदीप नाईक तसेच काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपामध्ये येण्यासाठी तयार असलेल्या कोळंबकर यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा दिला होता. शिवेंद्रसिंहराजे साता-यातील जावळीचे, पिचड अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कोळंबकर मुंबईतील वडाळा तसेच नाईक हे नवी मुंबईतील बेलापूरचे आमदार आहेत. तर कोळंबकर यांनी आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पक्षाचा राजीनामा दिला होता. कोळंबकर हे पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून 6 वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाविषयी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेत्यांनी म्हात्रे यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी नाराजी कायम ठेवून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर भूमिका स्पष्ट केली.

Exit mobile version