Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घराच्या बांधकामाच्या कारणावरून कुटूबांतील चौघांना बेदम मारहाण

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरातील जयहिंद चौकात घराच्या बांधकामाच्या कारणावरून एकला पत्नीसह वडीलांना लोखंडी आसारीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २ डिसेंबर रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय दगडू चौधरी (वय-४५) रा. जयहिंद चौक, एरंडोल हे आपले वडील दगडू चौधरी व पत्नी सुनिताबाई चौधरी यांच्यासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराच्या बाजूला राहणारे बापू रतन चौधरी यांनी घराच्या बांधकामावरून संजय चौधरी यांच्याशी शनिवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वाद झाला. यात बापू रतन चौधरी याने संजय चौधरी यांना बांधकामाच्या खड्ड्यात लोटून दिले. भांडण आवरण्यासाठी आलेले संजयचे वडील दगडू चौधरी व पत्नी सुनिताबाई चौधरी हे आवरण्यासाठी आले असता बापू चौधरी याने हातातील लोखंडी आसारीने वडील व पत्नीला मारहाण केली. तसचे बापूचे नातेवाईक निर्मलाबाई रतन चौधरी, कल्पनाबाई ज्ञानेश्वर चौधरी आणि अनिताबाई बापु चौधरी यांनी संजय चौधरी, वडील दगडू चौधरी, पत्नी सुनिताबाई चौधरी आणि आई कमलाबाई चौधरी यांना बेदम मारहाण केली. यात चौघेजण जखमी झाले आहे. याप्रकरणी संजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बापू रतन चौधरी, निर्मलाबाई रतन चौधरी, कल्पनाबाई ज्ञानेश्वर चौधरी आणि अनिताबाई बापु चौधरी सर्व रा. एरंडोल यांच्या विरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल पाटील करीत आहे.

Exit mobile version