Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरीच्या लोखंडी प्लेटांसह चौघे पोलीसांच्या ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मानराज पार्क समोरील राष्ट्रीय महामार्गावरून चोरीच्या लोखंडी प्लेटा चोरून नेत असतांना जिल्हापेठ पोलीसांनी गुरूवारी २९ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास चौघांना वाहनासह ताब्यात घेतले. लोखंडी प्लेटा ह्या अमळनेर तालुक्यातील मारवड येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी चौघांना मारवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

अधिक माहिती अशी की, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गणेश पाटील आणि समाधान पाटील हे २९ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता मानराज पार्क परिसरात पेट्रोलींग करत होते. दरम्यान, मानराज पार्कसमोरील राष्ट्रीय महामार्गावर (एमएच १९ क्यू ४७६०) हे वाहनात चौघांच्या संशयास्पद हालचाली पोलीसांच्या दिसून आल्या. त्यांनी वाहन थांबवून वाहनाची चौकशी केली. वाहनामध्ये ज्ञानेश्वर सोपान कोळी (वय-२७), मिथुन निरामन गोसावी (वय-३६), लखन एकनाथ सपकाळे (वय-३०) आणि विष्णू श्रीधर कोळी (वय-३७) सर्व रा. शेळगाव ता.जि.जळगाव हे दिसून आले. त्यांची कसून चौकशी केली असता वाहनातील १७ लोखंडी प्लेटा अमळनेर तालुक्यातील मारवड येथून चोरून नेत असल्याची कबुली दिली. जिल्हापेठ पोलीसांनी चौघांना ताब्यात घेतले. यासंदर्भात जिल्हापेठ पोलीसांत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी चौघांना मारवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोहेकॉ गणेश पाटील, समाधान पाटील, विनोद पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version