Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरीच्या दुचाकींसह चौघे एमआयडीसी पोलीसांच्या जाळ्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील एकाची दुचाकी लांबविणाऱ्या चौघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी व शाळेतून चोरी गेलेले साहित्य हस्तगत केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील भरत गंगाराम बारी (वय-४३) रा. शिरसोली ता. जि.जळगाव यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएल ३०३२) ही घरासमोरून चोरट्यांनी २१ मे रोजी रात्री ११ वाजता चोरून नेल्याचे उघडकीला आले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही दुचाकी चार जणांनी चोरून नेल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने बुधवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री कारवाई करत संशयित आरोपी अजय विजय भिल, किरण गोपाळ भिल, मयुर किशोर बारी आणि सौरव राजू सोनवणे सर्व रा. शिरसोली ता.जि.ळगाव यांना अटक केली. त्यांनी चोरीच्या दोन दुचाकी आणि शिरसोली शाळेतील चोरून नेलेले साहित्य काढून दिले. याप्रकरणी चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पोहेकॉ अल्ताफ पठाण, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, सचिन पाटील, पो.कॉ. छगन तायडे, किरण पाटील, विशाल कोळी, राहूल रगडे यांनी केली.

Exit mobile version