Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शालेय साहित्य चोरी प्रकरणी चौघांना अटक

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील रायपूर येथील ज्ञानगंगा विद्यालयातील शैक्षणिक साहित्य चोरी प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चौघांना गजाआड केले आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत रायपुर ता. रावेर येथील ज्ञानगंगा विद्यालयात दि. २८ ते दि.२९ रोजी सकाळी १०.०० वाजेचे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शाळेचे ऑफीसचे कडीकोंडा तोडुन आत प्रवेश करुन शालेय विद्यार्थी यांचे शैक्षणीक अभ्यासक्रमा करीता असलेले संगणक, प्रोजेक्टर, एल ई डी टीव्ही, वजनकाटा व इतर साहीत्य असे महागड्या ऐवजावर डल्ला मारला होता.

या अनुषंगाने शाळेचे प्राचार्य यांनी सावदा पोलीस स्टेशन गाठुन घडलेला संपुर्ण प्रकार सहा. पोलीस निरीक्षक श्री. पळे यांच्यासमोर समोर कथन करून विद्यार्थी यांचे शैक्षणीक साहीत्याचा लवकरात लवकर तपास लावण्याची विनंती केली होती. त्यावरुन सावदा पोलीस स्टेशन येथे दि.२९/११/२०२३ रोजी गुरनं २४०/२०२३ प्रमाणे घरफोडीच्या कलमान्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या प्रकरणी सपोनि श्री पळे सो यांनी एसडीपीओ राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाने पोलीस गस्त वाढवुन त्यांची तपासचक्रे गतीमान करुन पोलीस हवालदार विजय पोहेकर, संजीव चौधरी, सुनिल कुरकुरे, बबन तडवी असे पथक तयार करुन त्यांना चोरट्यांचा मागोवा घेवुन सत्वर गुन्हा उघड करण्याचे आदेश देवुन मार्गदर्शन केले.

पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत एका संशयीत आरोपीतास ताब्यात घेतले, त्यास पोलीस खाक्या दाखवताच त्याने अपराधाची कबुली देवुन त्याचे साथीदारांची नावे पोपटा सारखी कबुल केली. पोलीसांना सदर प्रकरणात एकुण ४ आरोपीतांना अटक केली असुन त्यांचे कडुन चोरीस गेलेले शालेय साहीत्य जप्त केले आहे.
सदर प्रकरणाचा तपास सुरु असुन यापुर्वी झालेल्या चोर्‍या उघड होण्याची चर्चा आहे. सदर प्रकरणातील चोरटे हे रायपुर गावातील स्थानिक रहीवाशी असुन विशेष म्हणजे ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेत चोरी करणारे निघाले. सदर प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहीती समोर आलेली आहे. या प्रकरणावरुन दिसुन येते प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलांकडे प्रकर्षाने लक्ष दिले पाहीजे.

सदरची चोरी उघड झाल्याने व त्यात स्थानिक तरुण मुलांचा सहभाग असल्याने रायपुर गावातील स्थानिक रहीवाशी देखील चकीत झाले असुन सदर कामगीरी बाबत स्थानिक रहीवाशी, तसेच शाळेचे संस्ताचालक व शिक्षक यांनी पोलीसांचे आभार मानले आहेत. सहा. पोलीस निरीक्षक सावदा पोलीस स्टेशन यांनी पालकांना आपल्या मुलांचे संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्या बाबत सुचना केल्या आहे.

Exit mobile version