Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वसंतनगर आश्रम शाळेत सत्यशोधक समाज स्थापन दिवस उत्साहात संपन्न

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वसंतनगर येथील माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेत सत्यशोधक समाज  स्थापना दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.

 

सत्यशोधक समाज  स्थापना दिनानिमित्त शाळेचे शिक्षक आर. बी. पाटील सर सत्यशोधक समाज सत्यशोधक का निर्माण केला?  सत्यशोधक समाजाचं तत्वज्ञान, आज अशा समाजाची गरज का आहे ? याबाबत विस्तृत मांडणी केली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल. एस. पाटील मॅडम होत्या. तर मुख्याध्यापक  सी. के. पोतदार, डी. एस पाटील, एम. डी.सूर्यवंशी, जी. एस. पाटील, के. आर. पाटील, प्रतिभा पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रा. हिरालाल पाटील यांनी सत्यशोधक समाजाची चळवळ कशी वाढली याबाबत विचार मांडले.  याप्रसंगी सूत्रसंचालन पी. एच. निकुंभे यांनी केले.तर आभार एस. जे. भामरे यांनी मानले.

 

Exit mobile version