एनसीबीचे माजी संचालक वानखेडे यांची उच्च न्यायालयात धाव

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा –   मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना विचारणा केली होती. या नोटीसी विरोधात केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत कारणे दाखवा नोटीसीला आव्हान दिले आहे.

मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने  एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात  तक्रार आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यास वानखेडे हे मुस्लीम धर्माचे सिद्ध होते. त्यामुळेजातीचा दाखला रद्द करून तो जप्त का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीससह स्पष्टीकरण देण्याचे आदेश समितीने वानखेडे यांना २९ एप्रिल रोजी दिले होते.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेली नोटीस रद्द करण्यासह, समितीने दिलेली नोटीस बेकायदेशीर, मनमानी आणि आपल्याला म्हणणे मांडण्याची संधी न देताच बजावण्यात आल्याचे वानखेडे यांनी याचिकेत म्हटले  आहे.

या प्रकरणी  चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करीत  राज्य समितीकडून केंद्रीय समितीकडे चौकशी हस्तांतरित करण्याची मागणी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत केली आहे.

अनुसूचित जातीत समाविष्ट असलेल्या महार जातीचे असून जात प्रमाणपत्र मिळवताना कोणतीही खोटी माहिती किंवा कागदपत्रे दाखल केली नाहीत. आई धर्माने मुस्लीम असली तरी आपण जन्मापासून हिंदु धर्माचाच आहे. जन्माच्या वेळी ‘मुस्लीम’ अशी चुकीची नोंद जन्म नोंदणी रुग्णालयाच्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. तसेच वडिलांच्या माहिती आणि संमतीशिवाय दाऊद के वानखडे हे नाव देण्यात आले होते. तसेच दहा वर्षांचा असताना वडिलांनी माझ्या शाळेतील आणि जन्म नोंदीत नाव बदलून घेण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया केली असल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे. शिवाय याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना यासंदर्भात तक्रार करण्याचा अधिकार नसून माझ्यावर केलेले आरोप खोटे असल्याचा दावा देखील वानखेडे यांनी केला आहे.

Protected Content