Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी आमदार राजीव देशमुख यांना कोरोनाची लागण

चाळीसगाव प्रतिनिधी । माजी आमदार राजीव देशमुख यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून त्यांनी आपल्या संपर्कातील लोकांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

चाळीसगाव शहरात राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेचे आयोजन ९ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मुंबईला परतल्यावर त्यांनी आपला कोरोना टेस्ट केली असता त्यात ते कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन केले असताना. आज चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार राजीव देशमुख यांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. शहराची सद्यस्थिती अतिशय बिकट असुन वाटचाल हे हॉटस्पॉट शहराकडे होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मी जबाबदार या मोहिमेचा सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Exit mobile version