Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार हरिभाऊ जावळे यांची निवड

haribhau javle

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार हरिभाऊ जावळे यांची निवड आज करण्यात आली.

शहरातील बाबा हरदासराम मंगल कार्यालयात भाजपची बैठक झाली. याप्रसंगी माजी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार हरीभाऊ जावळे, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील,  आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, किशोर काळकर आदींची उपस्थिती होती.

जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेच्या प्रारंभी मोठा गोंधळ झाला. भुसावळातील नियुक्तीबद्दल भाजपमधील अंतर्गत कलह उफाळून आला. भुसावळच्या काही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घालत प्रा. सुनील नेवे यांच्या मानमानी कारभाराचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या अंगावर शाईफेक करून त्यांना मारहाणदेखील करण्यात आली. यानंतर बर्‍याच वेळाने ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आमदार हरिभाऊ जावळे यांची निवड घोषीत करण्यात आली.

यांनी दिल्या शुभेच्छा

भाजप जिल्हाध्यक्ष निवड झाल्या बद्दल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेव दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन,खा.उन्मेष पाटील,खा.रक्षा खडसे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, आ.चंदूलाल पाटील, आ.संजय सावकारे, आ.स्मिता वाघ, जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, डॉ संजीव पाटील यांच्या सह मान्यवरांनी सत्कार करीत माजी आमदार हरी भाऊ जावळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version