Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कोथळीत केले ब्लॅंकेट्स वाटप

WhatsApp Image 2019 12 22 at 6.57.04 PM

भुसावळ, प्रतिनिधी | कै. जोग महाराज वारकरी प्रशिक्षण संस्था कोथळी येथे विद्यार्थ्यांना माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी ब्लॅंकेट्स वाटप केले.

आज माजी महसूल मंत्री यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील कै. जोग महाराज वारकरी प्रशिक्षण  संस्थेस भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट्स वाटप केले. तसेच माजी मंत्री खडसे यांनी मुक्ताई मंदिर बांधकामाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजप तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, माजी सभापती विलास धायडे, राजु माळी आदी उपस्थित होते.

Exit mobile version