Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भारताचे माजी सलामीवीर माधव आपटे यांचे निधन

madhav

मुंबई प्रतिनिधी । माजी कसोटीपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचे आज मुंबईत सकाळी 6 वाजता निधन झाले. भारताकडून सात कसोटी सामने खेळणाऱ्या माधव आपटे यांनी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

आपटे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४८ साली केली. ते फलंदाज म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांची सुरुवात मात्र फिरकी गोलंदाज म्हणूनच झाली होती. एल्फिन्स्टन कॉलेजमघ्ये शिकत असताना त्यांनी विनू मंकड यांच्याकडून गोलंदाजीचे धडे घेतले. त्यांनी सर डॉन ब्रॅडमन यांना त्यांच्या शेवटच्या इनिंमध्ये १०० ची सरासरी घेण्यापासून रोखले होते. ते १९ वर्षांचे असताना त्यांनी मेरीलबोन क्रिकेट क्लब विरुद्ध भारतीय विद्यापीठांचे प्रतिनिधीत्व केले होते. हेच त्यांचे प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील पदार्पण होते. त्यावेळी ते पॉली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू ठरले. आपटे यांनी सन १९५२ ते १९५३ या कालावधीत ७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले तर त्यांनी ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’चे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे. ते मुंबईचे नगरपालही होते. सन १९५४ मध्ये त्यांनी केवळ एकच प्रथम दर्जा क्रिकेटचा सामना खेळले.

Exit mobile version