Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौटाला यांना तुरुंगवासासह दंडात्मक शिक्षा

नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना ४ वर्ष तुरुंगवास आणि ५० लाख रुपये दंडात्मक शिक्षा सुनावली आहे. दिल्ली येथील विशेष सीबीआय न्यायालयाने आज निर्णय दिला आहे.
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या विरोधात १९९३ ते २००६ दरम्यान उत्पन्न स्त्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमा केली, ते नियमित ग्राह्य उत्पन्नापेक्षा अधिक आहे. त्यानुसार नियमित उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती मिळवल्या प्रकरणी दोषी ठरवत माजी मुख्यमंत्री चौटाला यांच्याविरुद्ध सीबीआयने २६ मार्च २०१० रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. तसेच २०१९ मध्ये इडी कडून चौटाला यांची पावणे चार लाखांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली होती. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी मनी लॉड्रिंगअंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरनुसार हि कारवाई झाली आहे.
दिल्ली येथील विशेष सीबीआय न्यायालयाने आज शुक्रवारी निर्णय देताना माजी मुख्यमंत्री चौटाला यांना ४ वर्षे तुरुंगवास आणि ५० लाख रुपये दंड ठोठावला असून त्यांच्या चार मालमत्ता जप्त करण्यासह कोर्ट रूममधूनच त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.
यावर चौटाला यांच्यातर्फे अपील दाखल करण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितल्यानुसार उच्च न्यायालयात जाऊ शकता असेही विशेष न्यायाधीश यांनी म्हटले आहे.

 

 

Exit mobile version