Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी शिक्षणमंत्री चौधरी यांचे कोरोनाने निधन

 

पाटणा, वृत्तसंस्था  । बिहारचे माजी शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी याचं वयाच्या ६८ व्या वर्षी कोरोनावरील उपचार घेतांना निधन झाले.

 जनता दल युनायटेडचे आमदार तथा माजी शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी हे  गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना संक्रमित आढलळे होते. तेव्हापासून ते पाटण्याच्या एका रुग्णालयात उपचार घेत होते. मेवालाल बिहारच्या तारापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. दरम्यान, बिहारमध्ये गेल्या २४ तासांत ८ हजार ६९० करोनाबाधित रुग्ण आढळळे आहेत. यानंतर राज्यातील एकूण कोरोनासंक्रमितांची संख्या ३ लाख २४ हजार ११७ वर पोहचलीय. २४ तासांत २७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय. आतापर्यंत राज्यात १ हजार ७४९ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय.

Exit mobile version